दिनांक : ३० ऑक्टोबर २०११.
दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होत्या आणि शेवटचा दिवस बाकी होता. घरी राहून खूप कंटाळलो होतो. गण्याला फोन टाकला आणि जंजिरा फिरून येऊ म्हणालो, त्याला सुट्टी नव्हती पण तो हो म्हणाला व जाण्याच नक्की झाल. लांबचा पल्ला आणि जाणारे दोघेच म्हणून सोबतीला आणखी दोघांना घेण्याचा निर्णय केला आणि गण्याने दोन मित्रांना तयार केल. आता माझ्यापुढे यक्षप्रश्न होता आमच्या वडिलांकडून परवानगी घेण्याचा. कारण आमचे पिताश्री म्हणजे शिस्तप्रिय आणि हिटलरवादी. अगदी नाक रगडून आणि गयावया करून "फिरायला" जाण्याची परवानगी घेतली. आमचा आमच्या वडलांचा आमच्यावर खूप जीव कारण शेंडेफळ ना घरातल! त्यांना सांगितलं मावळात चाललोय, आणि जवळच आहे म्हणून परवानगी मिळाली. जाण्याची तयारी झाली, तयारी म्हणजे काय? पाठीवर दप्तर, पूर्ण चार्ज केलेले मोबाईल आणि एक ३/४ विजार. इंटरनेट वरून अंतर काढाल, "पुणे-अलिबाग" १೪೦ किमी फक्त!! त्याहीशोबाने गणित केल आणि विचार केला आगदी आरामात गेलो तरी तीन-साडेतीन तासात जाऊ. या आधी खूप किल्ले फिरलो होतो पण जा जरा जास्तीचा पल्ला होता व नेहमी प्रमाणे नियोजन पार पडत होत.
३० ऑक्टोबर ला पाहते ५.३० ला भोसारीतून निघालो मी-गणेश आणि रोहित-सचिन असे चौघे निघालो. उत्साहाला तर नुसत भरत आल होत कारण मी पहिल्य्पासून शिवभक्त आणि गेले दीड-दोन वर्षपासून शिवचरित्रे, इतिहास,कादंबर्या, ग्रंथ इत्यादी वाचण्याच वेड जडल होत आणि जंजिर्याचा इतिहास तर पाठ झाला होता "अभेद्य जंजिरा" पाहण्याची उत्सुकता तर खूप होती. निघालो, राष्ट्रीय महामार्ग ४ ने सुसाट. पहाटेची वेळ, हवेत गारवा भरला होता. लवकर अंतर कपात आम्ही निघालो.
खोपोलीत आली आणि पोटात भर टाकावी म्हणून थांबलो, सकाळी निघायच्या कैफात मी तर पाणी देखील घेतलं नव्हत. एक उपहारगृहात मिसळीवर ताव मारला आणि चैतन्यकांडी घेतली व बाहेर पडलो. निघणार इतक्यात घात झाला, दुचाकीच लॉक खराब झाल, आता काय? कारण इतक्या सकाळी कोणी दुरुस्तीवाला मिळण म्हणजे वाळवंटात पाणी मिळण्यासारखाच होत. पाऊन तास स्वत: खटाटोप केली पण व्यर्थ! शेवटी एक रिक्षावाल्या काकांना विनंती केली त्यांनी काय केल ठाऊक नाही पण गाडी सुरु झाली. प्रवास सुरु झाला. पूर्ण रस्ता ठाऊक नसल्याने विचारत विचारात पुढे सरकत होतो. माझ्या डोक्याला जास्त ताण याचा होता कि ठरलेल्या वेळेपेक्षा पाऊन तास उशीर होणार होता. पुढे जाताना गण्याच्या डोक्यात विचार आला पालीला जाऊन गणरायाच दर्शन घेऊन पुढे जाऊयात. पण आमच्या सर्वांच्या मतदानानुसार त्याच पाली विधेयक नामंजूर झाल व सर्वांनी अलिबाग कडे गाड्या सुसाट सोडल्या. महामार्ग संपला दुसरा घात झाला. रस्ता!! रस्ते इतके खराब होते कि वाटल इथल्या राजकारण्यांनी पिंपरी-चिंचवड ला रस्ते पाहून याव. जेथे आमच्या दुचाकी ६०-७० प्रतिताशी च्या हिशोबी धावणार होत्या त्यांचा वेग आता ३०-४० प्रतितास इतका झाला. यासर्व गोष्टींची मला व गण्याला बर्यापैकी सवय होती पण रोहित आणि सच्या जाम वैतागले होते. समुद्रातठ दिसला अन जीवात जीव आला पण अजून किती अंतर कापायचं याचा कुणालाच अंदाज येत नव्हता. कारण सरकारी फलक जे अंतर दाखवत होते त्यापेक्षा हे अंतर हनुमंताच्या शेपटी प्रमाणे वाढतच होते. रडत-खडत १५० किमी चा रस्ता पार पडून अलिबाग ला पोहोचलो. सचिन आणि रोहित ने सुचवलं समुद्रात जाऊन येउयात. पण आमच लक्ष ठरलेल होत जंजिराच!!!
अलिबाग ला पोहचलो तेव्हा १०.१५ झाले होते ठरलेल्या वेळेच्या सव्वातास उशीर. मनात आल इथून जंजिरा ८-१० किमी असेल आपण लगेच पोहचू. रोहित ने विचारल कि "अजून किती जायचं?" आणि त्याचा वैतागलेला चेहरा पाहून मी मस्करी च्या हेतूने बोललो "अजून ५०-५५ किमी जायचं." मुरुड च्या दिशेन निघालो आणि रस्त्यात एक धूसर, अस्पष्ट पाटी वाचली 'मुरुड-जंजिरा : ५२ किमी' आता मला कळेना हसव कि रडावं. मघाशी केलेली थट्टाखरच निघाली आणि पुन्हा एकदा नवीन संकट उभं राहील. आणि त्यात कहर म्हणजे खराब रस्ता. राहित्या तर अगदी रडकुंडीला आला होता. आम्ही बोलून-चालून पुणेकर, आणि पुण्यातल वातावरन मानवलेली मानस. आणि इथे वरून सूर्यदेव आपला प्रकोप दाखवत होते, दमट वातावरण, न संपणारा रस्ता आणि आम्हा दोघांचा जंजिर्याचा हट्ट. मुरुड चा रस्ता विचारत विचारत पुढे सरकत होतो. एका ठिकाणी वाचाल 'मुरुड २१ किमी' जरा हायसं वाटल. पुढे गेलो पुन्हा तेच 'मुरुड २० किमी'. साला! अस वाटल कि झक मारली आणि इथे आलो. शेवटी ११.३० ला मुरुड ला आलो आणि जंजिर्याच प्रथम दर्शन झाल. अजून आमच्याकडे साडेतीन तास होते. कारज जाण्याच्या आधी निघण्याची वेळ ठरवली होती, काहीही झाल तरी दुपारी ३ वाजता परत निघायचं. गाडीतळावर गाडी लावली आणि गण्याने अजाणतेपणी गाडी लॉक केली, आणि संपल! मी बोट च्या तिकिटासाठी सांगेत उभा होतो . तिकीट घेतली होती आणि बोटीकडे जाण्याच्या रांगेत होतो. मनात विचार होते इथपर्यंत कसेतरी पोहचलो आता आणखी विघ्न नकोत. आणि इतक्यात गणा आलाच आणि सांगितलं गाडी पुन्हा लॉक झालीये. रांग सोडली आणि गाडीसाठी पुन्हा प्रयत्न सुरु झाले. दुसर्या गाडीने मुरुड गावात गेलो. कोणीही मेकॅनिक भेटेना, एक चावी बनवणारा भेटला पण तो म्हणाला, " मियां, हम तो शादी में जा रहे है, खाना खा कर हि आएंगे." आणि त्या सर्व भागात मुसलमान वस्ती, दुपारचे १ वाजलेले सगळ्याची नमाज ची वेळ असल्यामुळे दुकाने बंद. अर्धा तास उन्हात थांबलो पण कोणीही भेटलं नाही. गण्या चा फोन आला 'गाडी सुरु झाली माघारी या.' जाऊन पाहतोय तर पुन्हा लॉक झाली. इतका मनस्ताप झाला कि बस. आधीच समुद्राकाठची दमट हवा व वातावरण, अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा, घोट-घोट पाण्यासाठी मोजावी लागणारी किंमत, मुसलमान व्यापार्यांनी चालवलेली लुट, फसलेल सगळ नियोजन आणि समोर होती लॉक झालेली गाडी. आम्ही चौघेही अगदी मेटाकुटीला आलो होतो. या दरम्यान किती तरी "हिंदू" लोकांनी मदत केली, पण व्यर्थ. शेवटी गणा ने थोड धाडस केल तोंडात पेट्रोल घेतलं आणि लॉक मध्ये सोडलं व थोड खोबरेल तेल सोडलं. लॉक निघाल आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. ६-७ किमी मुरुडला समुद्रकिनार्यावर आलो. दीड-दोन तास घामाने निथळलो होतो. फक्त खिशातल्या चीजवस्तू काढून तसाच पाण्यात झोपलो. पहाटे पासूनचा ६ तासांचा प्रवास, अगणित विघ्न, व झालेला शीण जरा धुऊन काढला. पुन्हा चैतन्यकांडी घेतली, जरा बर वाटल. आता मेकॅनिक शोधन मोठ काम होत. मुरुड गावात एक चक्कर मारली, एक स्पेअर पार्टस च दुकान दिसलं पण बंद, नाव होत "राज ऑटोमोबाएल्स" एक हिंदू नाव वाचल आणि मदतीची अशा लागली. बोर्डवरून नंबर लावला, आणि त्याला घरून बोलावलं. त्याने गाडी कामचलाऊ करून दिली. त्याचे मानधनासह शतश: आभार मानले. घड्याळात पाहिलं तर वाजले होते ३ !!
निघालो, सकाळपासूनचा प्रवास, समोर असून जंजीर्याने दिलेली हुलकावणी. या सर्वांची हुरहूर मनात होती. खूप नाराजीने परतीचा प्रवास सुरु झाला. माझ्या मनावर एक मोठ दडपण होत वडिलांना दिलेली वेळ पाळण. आलिबाग कडे आलो. एका पोलीस काकांना विचारल पुण्याला जायला जवळचा रस्ता विचारला व त्या नवीन रस्त्याने निघालो. गाडीवरच गण्याने सांगितलं कि आता "ताम्हिणी घाटातून" जायचं आहे काहीतरी गिळून घ्या. नजर आजूबाजूला फिरली तर साला काहीच नव्हत. एका वडापाव च्या गाडीजवळ थांबलो दोन-चार वडापाव चेपले, चैतन्यकांडी घेऊन निघालो. रस्ता नक्की ठाऊक नव्हता, कारण कुणाच्या तरी सांगण्यावरून इतक्या दुराचा पल्ला करावा कि नाही यावरून गणा आणि रोहित मध्ये मतभेद होते तर मी आणि सच्या तटस्थ होतो.
आता कोलाड गावात पोहोचायचं होत, तिथून घाटात जाण्यासाठी रस्ता होता. रस्त्यातच ४-५ दुचाकी दिसल्या आणि नंबर पहिले तर "MH - १२", जरा हायस वाटल कारण त्या घाटाच्या बर्याच गोष्टी एकूण होतो त्याही वाईट कारणासाठीच. म्हणून सोबती भेटल्याचा आनंद होता पण ते साले जास्तच हळू चालवत होते आणि आम्हाला वेळेच बंधन होत. मग सुसाट निघालो, घाटाच्या रस्त्याला लागलो किती अंतर हे माहिती नव्हत पण गाडीत पेट्रोल भरपूर होत, विचार केला जे होईल ते होईल रस्ता संपेपर्यंत चालतच राहायचं. रोहीत्या जरा जास्तच वाईट चालक होता, मागे बसणाऱ्याचा विचार करताच नव्हता. गाडीचा वेग ६०-७० ने होता आणि अचानक समोर "नागराज" अवतरले. जर ब्रेक लावावा तर आम्ही जाणार आणि नाहीतर नागराज. रोहीत्याने गाडी तशीच त्याच्यावरून घातली. त्याला या प्रसंगच काहीच वाटल नाही पण माझ्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली कारण माझा जन्म शेषकुळातला आणि आमच्यात नाग-सर्प मरण निषिद्ध, देवाला कुठे मारतात का?
अंधार पडत होता, वेळ जात होती, रस्तापाहून तर आधी कॉंग्रेस सरकारला आणि नंतर गण्याला शिव्या देत होतो. अंधार पडला आणि सगळ्याचीच फाटली. समोरच काहीच दिसत नव्हत. गण्याच्या गाडीची हेडलाईट काम करत नव्हती, सकाळपासूनच्या अविश्रांत परिश्रमान आमच्या गाडीच कंबरड मोडल होत. तितक्यात एक चारचाकी वाला थांबला, विना हेडलाईटचा सगळ्या कुटुंबासोबत हा दिड्शाहाना ताम्हिणी घाटातून चालला होता. त्याने विनंती केली तुमच्या गाडीच्या प्रकाशात आम्हाला येऊ दयात. आता खरी कसरत सुरु झाली, गण्या पुढे माघे आम्ही व आमच्या मागे तो चारचाकी घेऊन एका गाडीच्या प्रकाशात चालल्या होत्या. व मस्त सर्कस सुरु होती. हवेत गर्व भरला होता अंगावरचे कपडे अजूनही ओलेच होते. थंडीने सगळेच कुडकुडत होते पण शब्द कुणाच्याही तोंडातून फुटत नव्हते. जसा अंधार पडला तसा माझा तोंडून अजाणते पाणी हनुमान चालीसा सुरु झाली. दिवसभर गझल म्हणत होतो आणि चालीसा ऐकल्यावर रोहीत्याने हटकलं आणि मी मोबाईल वरच मोठ्या आवाजात सुरु केली. त्या ७०-८० किमी च्या प्रवासात मी कितीवेळा चालीसा म्हणालो ते साक्षात हनुमंतालाही मोजता येणार नाही. रस्ता काही संपत नव्हता सगळेच अगदी रडकुंडीला आल्यासारखे दिसत होते. रोहित असा प्रवास या आधी कधीच केला नव्हता. शेवटी तो भयानक रस्ता संपला, जवळ-जवळ ८० किमी एका गाडीच्या प्रकाशात प्रवास केला. त्या निर्लज्ज चारचाकी वाल्याने आणखी १०-१२ किमी चालण्याची विनंती केली आणि कोरडे धन्यवाद हि नाही दिले. जरा थांबलो. माझ्या घरून फोन आला वडिलांनी भरपूर संचार घेतला. रोहित ला पण फोन आला त्याच्यावरही घरून चांगलीच सरबत्ती झाली. १०-१५ मिनिटे थांबलो आणि पुन्हा निघालो. शहरातले रस्त्यावरचे दिवे पहिले आणि मघाचे दोन-अडीच तास आठवले.
मी,गणा,सचिन आधीच हाडाचे आजारी म्हणजे तिघानाही कसला ना कसला त्रास होता. माझ्या उजव्या पायाला मी ३ वर्षांपूर्वी अपघातात मोडून घेतला होता. गण्या तर ७-८ महिन्यापूर्वीच मरता-मरता वाचला होता, ७ सळया होत्या उजव्या हातात, ६ काढल्या होत्या आणि अजून एक हातातच होती. आणि सचिनला तर अनुवांशिक माकडहाडाच दुखन होत. परतताना थंडीने आणि अविश्रांत प्रवासाने आम्हा तिघांच्या अवयवांनी साथ सोडली होती. त्याचं नाही ठाऊक पण माझ्या गुढग्यात प्रचंड कला येत होत्या, अगदी दिल्यात पाणी उभ राहील होत. फक्त वाट पाहत होतो शेवटच्या काही मिनिटांच्या प्रवासाची. तेही क्षण सरले, भोसरीत पोहोचलो. सगळ्यांची गळाभेट घेतली सचिन - रोहित आपापल्या घरी परतले. गण्याने घरी सोडलं आणि तोही परतला. प्रवास संपला. संपूर्ण अंग ठणकत होत डोल्यंतून अखंड पाणी वाहत होत आणि लाल होऊन सुजलेही होते बिचारे. खूप सार्या कडू आणि थोड्याश्या धाडसी आठवणी घेऊन परतलो होतो पण दुचाकीवर फिरण्याचा माज मात्र पुरता मोडला होता आणि आमचा एका दिवसात एकूण प्रवास झाला ४२५ किमी फक्त!!!
हे प्रवासवर्णन लिहिताना एक गोष्ट मनात आली कि इतिहासात छत्रपती शिवरायांना याच किल्ल्याने सतत २०-२२ वर्षे आठ चढायात हुलकावणी दिली. छत्रपती शंभूराजांनी सुद्धा एकदा चढाई केली पण तेव्हाही जन्जीर्याने महाराजांना हुलकावणी दिली. जिथे या दोन युगपुरुषांना किल्ल्याने फसवल तिथे आम्ही कीस पेड कि पत्ती, असा विचार आला. पण हे जन्जिर्याचाच दुर्दैव आपल्या महाराजांचे आणि युवराजांचे चरणस्पर्श झाले नाहीत...