Monday, 7 April 2014

माझ्या आठवणीतला कोकण...

    ७ .४० ला चार गाड्या निघाल्या, ठिकाण होत कात्रज चौक, आठ जण आणि वाट होती कोकनाची. प्रत्येकाने आपापल्या घरच्यांना सोइस्कर पणे थापा मारुन तीन दिवसानकरिता मनवल होत. चौकात पोहचलो, मला एक दोन चेहरे नवीन होते. सगळ्यांनी ठरलेली रक्कम KD च्या ताब्यात दिली. आणि एक मिनिट यातली पात्र सांगायचीच राहिली. संभा, गोप्या,महेंद्रा, विर्‍या, सॅंडी, KD,जितु, आणि अखेरीस मी. यातील प्रत्येक व्यक्ती ही अगदी दुर्मिळ व्यक्तिमत्वाची आगदी तिकीट काढून पहाव इतकी वल्ली. आणि आता असल्या पात्रांसोबत तीन दिवस काढायचे होते. मला स्वताः ला थोडी उत्सुकता जास्त होती. या आधी २-३ दिवसांच्या सहली करिता गेलो नव्हतो किंबहुना घरच्यांनी पाठवल नव्हत म्हणा.

निघालो! सगळ्यांच्याच उत्साहाला तोटा नव्हता. हवेत. बराचसा गारवा भरला होता. सुर्यनारायण बरेचसे वरती आले होते. KD ने सगळ्या गाड्यांमधे पेट्रोल भरून घेतल आणि आता खरा प्रवास सुरू झाला. एकमेकांचे फोटो काढत ओरडत, बोम्बलत, खिदळत आठ जणांची मिरवणूक पुढे धावत होती. मुळशी मधे प्रवेश केला, दाट झाडी आणि पाणी यामुळे गारवा जाणवत होता. पिरंगुट  च्या अलीकडे थांबलो व चहा पाणी घेतल. आमच्यातले बरेचसे चेहरे एकमेकांसाठी नवीन होते पण सार्वजनच जुळवून घेत होते. प्रवसापासूनच मी आणि संभा एका गाडीवर होतो. सांगायाच राहील आज संभाचा वाढदिवस.

पौड सोडाल आणि तम्हिनी घाटातून निघालो. मला आठवला या पूर्वीचा माझा याच घाटातील पूर्वीचा प्रवास. हाच घाट त्यावेळी आमचा अंत पाहत होता आणि आज त्याच शांत रूप पाहत होतो. रस्त्याच्या एक कडेला गाड्या उभ्या केल्या आणि फोटोसेशन सुरू झाल. पॉज देण्यात प्रत्येकाच्या स्वतःच्या वेगवेगळ्या शैली होत्या. प्रवास कंटाळवाणा होत नव्हता तो यामुळच. चार पैकी तीन गाड्या व्यवस्थित सुरू होत्या थट्टा मस्करी आणि मस्तीत जात होत्या. विर्‍या-जित्या च्या गाडीवर शांती होती. जित्या प्रथमदर्शनी वाटला तसाच होता मीतभाषी आणि शांत आणि विर्याच्यात भरपूर किडे होते. त्यामुळे दोघात संवाद होन कठीण होत. माणगावात आलो पोटातले कावळ्यांनी हाक द्यायला सुरुवात केली. साडे आकरा झाले होते. पिरंगुट मध्ये घेतलेला चहा आणि ताम्हीनीत महेंद्र ने आणलेला "खारा" गाजराचा हलवा इतक्या इंधनावर शरीर इथवर पोहचल होत. मग शिरलो एका हॉटेलात आणि पोह्यांवर आडवा हात मारला, लिंबू पिळून. अर्ध्या तसाच ब्रेक घेऊन निघालो.

वाढत चाललेला उष्मा आणि उतरत्या छपराची घर कोकणात उतरल्याचा खुणा सांगत होती. नारळी-पोफळीच्या झाडांची दाटी वाढू लागली होती मध्येच कुठे फणसाची झाड तर कुठे चिंच डोकावत होती. डोळ्यांत हे सौंदर्य साठवत पुढे धावत होतो. हरिहरेश्वर च्या प्रवेशताच आम्हाला पोलिस आडवे आले. लायसन्स पाहण्यासाठी. गोप्या जवळ नव्हत तिथ त्याला १०० ला पडला (बांबू!) पुढे निघालो ते गोप्या ला शिव्या देतच. निघण्याआधीच सर्वांना बजावून सांगितलं होत. थोड पुढे गेलो नाहीतर पुन्हा एकदा कुत्रं आडव आलं. यावेळी हेल्मेट नाही म्हणून पडला. संभ्या तर जाम तडकला होता. अडीच च्या सुमारास हरिहरेश्वरला पोहोचलो. सर्वानुमते खोली आधी घेण्याच ठरलं. आम्ही सगळे पार्किंग पाशीच 'हिरवळ' पाहत बसलो KD , संभा, सेंड्या खोली शोधायला गेले. आम्ही उन्हाला विटलो होतो . हे तिघे परत आले. खोली मिळाली. तिथेच गोप्याची गाडी देखील पंक्चर झाली, सर्वांनी एकमेकांच्या तोंडाकड पाहिलं. आणि एकाच उत्तर आलं 'नंतर बघू'.

गोप्या सोडून सगळ्यांना खोली आवडली, पाठ टेकवण्यासाठी रात्रीपुरती जागा हवी असाच सर्वांच मत होत. जरा हात पाय धुतले, प्रवासाचा आलेला शिन थोडा सूर केला आणि सर्वे हरिहरेश्वरच दर्शनास गेलो. देवपूजा झाली आणि पोटपूजा करायची होती. साला सगळी कडे 'घरगुती खानावळी'. मला समजत नाही घरगुती खायचं असेल तर आम्ही बाहेर का खाव ते पण कोकणात येवून. जवळपास कुठे ढाबा अगर हॉटेल काहीच नाही. आणि दुसरा पर्याय पण नाही. मग काय 'जय पोटोबा आणि जय खानावळी'. पानावर बसलो, सर्वांकडे नजर टाकली, धुळीने रापलेले, काळवंडलेले आणि वैतागलेले चेहरे दिसले. ताट आल्याबरोबर सगळे अक्षरश तुटून पडले. पोहे वगैरे कधीच जिरले होते. जेवण उरकून जरा स्वस्त बसलो. जरा सुस्तावलो. डोळ्यांवर झोप तरळू लागली होती.

सगळ्यांना समुद्र आता खुणावत होता. अगदी प्रवासाच्या सुरुवात्तीलाच ठरलं होत. पाहायचे तर फक्त कोकणातील समुद्राकीनारेच. मंदिराच्या मागून खाडीकडे उतरलो. समुद्रच फेसाळत येणार पाणी दिसलं. खडकांवर आदळणाऱ्या लाटा सर्वांना बोलावत होत्या. सागरच विशाल रूप समोर दिसत होत. निळसर खर पाणी किनार्याकडे झेपावत होत. कडक उष्मा असूनही लाटांमधून उडणारे पाण्याचे तुषार अंगाला सुखावत होते. खडकांमधून खेकड्यांची पिलं तिरकी धावत जात पाण्यात मिसळत होती आणि तिथ या माणसांच्या कार्ट्यांनी उच्छाद सुरु केला होता. मघाशी जेवणाच्या पानावर आलेली मरगळ त्या खार्या पाण्यात विरघळली होती आणि सगळे फुल फोर्मात आले होते. सगळेजन नाचत, खिदळत, उद्याच मारत होते. पण या सगळ्यात एक गोष्ट कायम होती ती म्हणजे फोटो काढण. प्रत्येक आठवण प्रत्येक क्षण कोणी ना कोणी टिपत होता. सगळा आनंद कॅमेर्यात बंद होत होता. सूर्य अजून बराच वर होता साडे चार वाजले असावेत. धमाल सुरु होती. मी कितीही सांगितलं तरी त्या वेळेच वर्णन कारण खरच कठीण आहे. सगळे इतके कैफात होते कि कपडे काढून नाचण बाकी होत.

सगळे खाडीवरून रेतीच्या किनार्यावर आलो. सगळेजण थोडेसे पांगले. स्वतंत्र चालू लागले. तितक्यात मी आणि गोप्याने KD ला उचलला आणि दोन-तीन झोके देऊन त्याच्या बुडाला रेतीच दर्शन दिल. आणि मग काय परत धिंगाणा सुरु. सूर्यास्त जवळ आला . आता सूर्याचा तो तांबूस रसरशीत गोल खाली उतरत होता. सूर्यकिरण आकसली होती. उष्मा संपला आणि गार हवेच्या सारी वाहत होत्या. थोड्याच वेळात सूर्य समुद्रात बुडी मारणार होता. आता किनाराही शांत होता. काही तुरळक लोक दिसत होती. सगळा किनारा मोकळा होता. एक विलक्षण शांतता पसरली होती. इतका वेळ धुडगूस घालणारी हि बिलंदर, एका जागी शांत बसलेली होती. आणि सगळे तो निसर्गाचा रंगमय सोहळा पाहण्यात गुंगावले होते. सूर्यास्त झाला. तरीही जरावेळ तसेच बसून राहिलो. निघालो! पायातले जोडे आपोआप हातात आले. आणि मऊ ओलसर रेतीचा स्पर्श झाला. " अगदी खासगी आहे पण सांगतो, रेतीच्या स्पर्शाने मला 'ती'ची आठवण करून दिली, अगदी हळुवार". असो. सूर्यास्ताचे भरपूर फोटो काढून झाले.

खोलीवर आलो गोड्यापाण्याने हात-पाय धुतले आणि पुन्हा क्षुधाशांती करण्याकरिता बाहेर पडलो. बर्यापैकी भूक होती. सर्वानुमते मांसाहार घ्यायचं ठरलं. पुन्हा 'घरगुती खानावळी' वर जाव लागल. जेवण तर झाल. उरकल्यावर संभा ला विचारलं, " तुझ्या पानात कोंबडी होती का रे...? माझ्या पानात तर दिसताच नव्हती." तांदळात खडे सापडावेत न तशी अवस्था त्या कोंबडीची होती. गप्पा मारत मारत खोलीवर आलो. सगळेच दमलो होतो. अंथरून पडली. अंग टाकल. बाकीच्यांना झोप लागली बहुतेक पण मी व संभा जागेच होतो. झोप तर येत नव्हती. नवीन जागा, त्यात थोडस कोंडत वातावरण त्यामुळ निद्रादेवी माझ्या डोळ्यांच्या आसपास देखील फिरकर नव्हती.रात्री बर्याच उशिरा डोळा लागला.
पहाटे जाग आली. सव्वा चार वाजले आणि सगळे विधी उरकून खोलीत आलो व सहाच्या दरम्यान सगळ्यांना उठवण्यास सुरुवात केली. सृष्टी कर्त्याने केवळ लाथ मारण्यासाठी निर्माण केलेल्या मांसल जागेवर लाथा घालून उठवाव लागल. आता पुन्हा सगळे किनार्यावर निघालो. हवेतला हलका गारवा जाणवत होता. फेसाळणार्या लाटांचा आवाज दूरवर ऐकू जात होता. प्रसन्न वातावण होत. धुसर प्रकाश सगळीकडे पसरला होता.किनार्यावर तर कोणीच नव्हत. एक निरव शांतता होती. आवाज होता तर फक्त लपलपनार्या लाटांचा. पावलं भिजतील इतक्या पाण्यातून आम्ही सर्वे चालत होतो. नि,जितु,विर्या, सेंड्या, एकत्र तर KD आणि महेंद्र स्वतंत्र चालत होते. गोप्या आणि संभा फोटो काढण्यात अडकले होते. लाटांच येणार पाणी पायाखालची वाळू खेचत होत. मऊ, सोनेरी रेतीत पाय हलके हलके रुतत होते. येणार पाणी पायांना गुदगुल्या गरात मागे फिरत होत. ' किती विलक्षण प्रसंग असतात ना हे! जेचा आपण खूप सुंदर, खूप वेगळ, खूप आनंददायी पाहतो तेव्हा काहीच बोलू शकत नाही. फक्त पाहत राहतो. निशब्द. तो क्षण आपण जागून घेत असतो. अस वाटत राहत कि केवळ हा क्षण पाहण्यासाठी, हा आनद भोगण्यासाठी आपण जिवंत आहोत. या नंतर अशी संधी पुन्हा मिळणार नाही.' अस काहीस झाल होत माझं. आणि बहुदा सगळ्यांचच.
आणि मग काय धिंगाणा रिटर्न्स. कपडे उतरवले आणि पाण्यात उद्या घेतल्या. बाहेरच्या गारठ्यापेक्षा पाणीच जास्त उबदार होत. संभ्या आणि गोप्या पाण्यात उतरले नव्हते. येणाऱ्या लाटा छातीवर येवून आदळत होत्या व खेचत परत आत नेत होत्या. पाण्यातली काळसर रेती अंगावर ठार चढवत होती. बराच वेळ पाण्यात पोहल्यावर खेळ सुरु झाला कबड्डीचा मी,जित्या,सेंड्या विरुद्ध KD , विर्या, महेंद्र. गोप्या उगाचच गरज नसताना पंचगिरी करत होता आणि संभा कॅमेरा काही सोडत नव्हता. मस्त पैकी ३ डाव झाले आम्ही एक व विरोधी संघ दोन वेळा विजेता ठरला. काळसर रेतीची ट्रॉफी मालिकाविजयी संघास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आणि विजेत्या, उपविजेत्या संघच पंचासामावेत फोटोसेशन झाल.खोलीवर अंघोळी उरकल्या आणि निघण्याची तयारी झाली. ११ च्या सुमारास हरिहरेश्वर सोडलं आणि निघालो बाणकोट किल्ल्यावर.
किल्ले बाणकोट!! इसवीसनाच्या पहिल्या शतकापासून ज्याचा उल्लेख आढळतो, सावित्री नदीच्या दक्षिण तीराच्या खाडीवरील हा बाणकोट. १६ व्या शतकाच्या मध्यात हा मराठ्यांकडे असल्याच्या नोंदी सापडतात. परतू हा किल्ला बहुतांश पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या ताब्यात जास्त काल राहिला. पण किल्ला म्हणालं कि 'भगवा' हे एकाच आम्हा सर्वांना ठाऊक म्हणून प्रत्येक किल्ला प्रिय.
४ किलोमीटर पुढे आल्यावर बागमान गावातून बोटीने जन अनिवार्य होत. २ किमी चा बोटीचा प्रवास . सुरु झाला. साला जिंदगीत पहिल्यांदा बोटीने प्रवास करत होतो छातीत धडधड होत होत. जेव्हा पाण्याच्या मध्यावर आलो तेव्हा. पाण्याच सामर्थ्य त्या एवढ्याश्या परवासात समजत होता. बोटीतून उतरल्याबरोबर माशांच्या उग्र दर्प आला. बाजूलाच झिंगे वळत पडले होते. पुढे ४ किमी वरच बाणकोट होता. पूर्ण रस्त्याला चढण होती. एकाबाजूला दिसणारा समुद्र आणि दुसर्याबाजूला दाट आमराई. समोर होता बाणकोट. तुटलेल्या तटबंदी मधून आत प्रवेश केला. लीला तसा लहानच पण तुलनेन इतरांच्यापेक्षा बर्या स्थितीत होता. बहुदा कोणीही फिरकत नसल्याने चांगला राहिला असावा. आत खूप दाट झाडी होती आणि गवत माजलेल. समोर मोठा खंदक होता. बरोबर किल्ल्याच्या मधोमध समोरच आत कुठेतरी जाणार भुयार होत. kd आणि सेंड्या उगाच आत जाण्याची धतींग करत होते जस काय इंडियाना जोन्स यांच्या घरावरून वरून गेलता. संभ्या ने चढल्यावर मागे फिरले. किल्ल्याला एक प्रदिक्षणा घातली आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या बुरुजावर जाउन बसलो

समोर समुद्रच निळाशारपाणी दिसत होत. सकाळी मोठ्यावाटणाऱ्या लाटा सुई इतक्या लहानहोऊन घरंगळत होत्या. दूर आत समुद्रातएक जमिनीचा 'पांढरा' तुकडा दिसतहोता. आम्ही सर्वे बुरुजाच्यातटावर बसून समोरच्या सागरकिनारीच्याआमराईच जंगल, नुकताच आमराईतआलेल्या मोहराचा सुगंध, इतक्यादूरवर सुद्धा ऐकू येणारा समुद्राचाआवाज, निळा समुद्र, हिरवी वनराई.रंग नाद, गंध या सर्वांनी ते वातावरणभरून आल होत. इतक्यात समुद्रातलातो 'पांढरा' जमिनीचा तुकडा हलला.आणि इखाद्या शांत जलाशयावर झाडाचंपान पडून जलतरंग उमटावेत त्याप्रमाणेतिथून समुद्रपक्षी दशदिशांतपांगले. सगळे तो निसर्गाचा अद्वितीयअविष्कार पाहण्यात गर्क होते.सुमारे ५ ते ६ हजार पक्षी असावेत.नंतर एका रांकेत आणि संथ लयीततिथून प्रस्थान केल. मग आम्हीदेखील निघालो. गाड्या काढल्या.
१०० मीटरच गेलोअसेल, आमच्या गाडीच्या मागच्याचाकातून सु ssssss करून आवाज आला.आमची सगळ्यांचीच पंक्चर झाली.गाडी बाजूला घेतली, चाक वेगळकेल. KD आणि सेंड्या ला दुरुस्तीसाठीपिटाळला. ४-५ किमी वर दुकान होत.शेजारीच एक वडाचा भल थोरलं झाडहोत. आणि थोडी फार लोकवस्ती. चार-पाचलोकाच्या घेरात देखील बसला नसततो वड. अंदाजे शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचाअसावा. खाली मोठी मोठी कातळ होती.त्याच्या थंडगार सावलीत बसलो.रात्री झोपेच खोबर झाल होत. गारवर आणि सावली यात डोळे झाकायलालागले होते. भूक तर खूप लागलीहोती. आणि जवळ पाण्याचा थेंबदेखील नव्हता. सहज वस्तीत चक्करटाकावीशी वाटली म्हणून मी आणिमहेंद्र निघालो. एखाद दुकानअसण्याची अपेक्षा होती. आणिभेटलाही. तिथूनच किलोभर फरसाणघेतलं आणि तिथल्या माउलीने गारपाणी देखील पाजलं. खर सांगू आतापर्यंतमला कोकणातल्या जेवणापेक्षापाण्याची चव जास्त आवडली. वडाखालीयेवून फरसाण संपवलं आणि जर पडलोचहोतो, इतक्यात महेंद्राने काहीतरीपिशवीतून काढलं, पाहिलं तर होतेपत्ते. माझा आणि त्यांचा दुरदुरपर्यंतसंबंध नव्हता. मी,जित्या,गोप्याआम्ही तिघांना यातलं शुन्य ज्ञान.पण विर्या, संभा आणि महेंद्रपट्टीचे खेळणारे. मग डाव मांडला५२ पानांचा, रमीचा!! आणि तोहीपैसे लावून. आम्ही फक्त प्रेक्षकवर्ग होतो. मी याचे चेहरे पाहतहोतो. क्षणात उजळायचे तर क्षणातमावळायचे. एखाद चांगल पान आलतर खुशीत एक टाळी आणि नाही निघालकि कपाळावर एक सूक्ष्म आठी. मलातर जुगार्याचा पहिल्यापासूनचराग. पण प्रत्यक्षात खेळतानापहिल्यांदाच पाहत. काय सालीतल्लीनता पत्ते खेळण्यात लावलीहोती. इतकी एखाद्या कामात लावलीअसती तर...सगळे त्या पानाच्याधुंदीत होते. जवळ येनात प्रत्येकपान त्यांना घडीत बादशाह तरघडीत भिकारी बनवत होत. KD आणि सेंड्याआले. मी त्यांना चाक जोडायलामदत करायला गेलो. परत आलो तर बहाद्दारांचेसहा सात डाव पडले होते. जी काहीरक्कम लावली होती ती इज्जतीतप्रत्येकाने परत केली. पण मलात्या दिवशी मला एक गोष्ट उमगली,जुगारी जुगारात वेडे का होतात.खरच हि ५२ पानं त्यांना स्वतातसामावून घेतात. त्यांना खेळातलाका होईना पण बादशहा बनवतात, गुलामबनवतात आणि राणीच्या मागेहीधावायला लावतात. आणि शेवटी कंगालसुद्धा करतात.

आता निघायचं होतकेळशी कडे. सुसाट निघालो, लांबदूरवर जाणारा रस्ता आणि दुतर्फापिवळ्या पडलेल्या गवतांच्याकुरणांचा तो भाग होता. थोडी हिरवळदिसू लागे पुन्हा उजाड अशी भाताचीखाचर. मधेच एखादी घरांची वस्तीदिसे. काटकोनात वळालेले रस्ते,चिऱ्याच्या भिंती आणि लाल कौलांचीघर मागे पडत होती. घरासमोर तुळशीवृंदावन नसेल पण नारळाची झाडहमखास दिसत होती. लाल मातीचाकच्चा रस्ता लागला. त्या लालमातीने आजू बाजूच्या झुडपांचारंग देखील आपल्या सारखाच केलाहोता. त्यावरूनच धुराला उडवीत'लाल-पिवळा' ST चा डबा देखील धावतहोता. छोट्या छोट्या नद्या सागरालायेवून मिळत होत्या. एकूण सगळप्रेमात पडणार वातावरण होत.
केळशीत पोहचलो.पारावर काही गावातली जुनी खोडबसली होती. त्यांनाच राहण्याच्यासोयी बद्दल विचारलं आणि किनार्यावरआलो. फरसाण जिरल होत. भूक लागलीहोती. दुपार टळली होती. आजू बाजूलाकाही हॉटेल वगैरे नव्हत. नाश्ताआणण्याची जबाबदारी माझी आणिमहेंद्रा ची होती आणि सोबत राहण्याचीसोय देखील करायची होती. गावातगेलो. नशीब साल इतक खराब कि गावातएकाच वडापाव ची गाडी आणि ती देखीलचार वाजता लागणार. पूर्ण गावप्रदक्षिणा पूर्ण केली आणि एकतीन टेबलांच हॉटेल मिळाल. त्यालापंचवीस वडापावची ऑर्डर दिली.त्याने ताबडतोब बटाटे उकडायलाघातले... संपलो!!! इतक्या वेळातपोर माझा जीव घेतील. पण पर्यायदेखील नव्हता. अर्ध्या तासानेनाश्ता घेऊन निघालो. जाता जाताघराची चौकशी केली. एक 'जानवं'बाहेर आल. खोली सर्वासोयींचीहोती आणि तुलनेने स्वस्त देखील.पुजारीन बाईंना ६-७ वेळा बजावूनसांगितलं, "तासाभरात येतोय,दुसर्या कुणाला खोली देवू नका."


वडापाव घेवून परत आलो. सगळीजण मलूल बसलेले होते. ओसाड किनारा बहुतेक कोणालाच आवडला नसावा. एका झाडाखाली बसून वडापाव चेपले. संभा ने केळशी बद्दल माहिती पुरवत होता उंबर टेकडी, याकुब बाबांची दर्गा, महालक्ष्मी मंदिर आणि बराच काही. केळशी चा किनारा मलाही जर भकासच वाटला. कधी कधी वाटत माणसाने निसर्गाला भकास करून टाकलाय. पण किनारा पाहून वाटल, आपण जर असे एकटेच असू तर त्या सौंदर्याचा आस्वाद घेणं देखील जीवावर येत. जरावेळ बसून निघालो. तासाभराच्या प्रवासातच हरणे बंदरावर पोहचलो. शे सव्वाशे बोटी पाण्यावर हेलकावे खात होत्या. किनार्यावर बाजारगर्दी फुलली होती. मी व विर्या सोडून सर्वेजन बाजारात घुसले. मला उगाचच सूर्यास्त पहावासा वाटला म्हणून मी जर वेगळा बसलो होतो. समोरचा अथांग समुद्र व त्यात दिसणारा सुवर्णदुर्ग.. एका वेगळ्याच सौंदर्याची अनुभूती घेत होतो. अचानक मोबाईल वाजला. दोन दिवसात पहिल्यांदा त्याला जाग आली होती. 'ती'ने फोन केला होता. निसर्ग आणि प्रेम या दोनीही गोष्टी सोबत होत्या. विर्या शेजारी येवून बसला. बोलत नव्हतो. स्तब्धपणे सूर्यास्त न्याहाळत होतो. सुर्यासमोरुन घरी परतणारे पक्षी, किनार्यावर बसलेल प्रेमी जोडपं...कसलासा संदेश देत होत. कोणी तरी माझी वाट पाहतंय.

परत गाड्यांजवळ आलो तर बहाद्दरांनी खेकड्यांचा बेत ठरवला होता आणि आता निघायचं होत मुरुडकडे . संधिप्रकाश पसरला होता. चारही गाड्या एका लयीत धावत होत्या. सगळेजण आपल्या विचारात असावेत. कोणीही खास अस बोलत नव्हत. प्रत्येक गाडीवर खालच्या आवाजात संवाद सुरु होता. मी आणि संभा देखील आपल्या खासगी जीवनातील पान खोलून वाचत होतो. यातच मुरुड आल.एका पानाच्या टपरीजवळ गाड्या लावल्या. आणि कामांची वाटणी करून घेतली. मी आणि गोप्या घराची सोय लावणार होतो. संभा, KD , आणि सेंड्या खेकडे शिजवण्याच व पोटाचा प्रश्न पाहणार आणि वीरया, जितु आणि महेंद्र गाड्यांजवळ थांबले. आम्ही रहायची सोय पाहत होतो पण मिळणारी जागा चांगली असे पण खिशाला परवडणारी नसे. एकाला चौकात हटकलं," राहायला खोली किंवा घर मिळेल का?" तो आम्हाला एका घराकडे घेवून गेला. बैठ घर होत, १००% शुद्ध कोकणी बनावटीच. उतरती कौलं, घराच्या डाव्या अंगाला एक लहान पडवी, पहिल्या दरवाजानंतर लहानसा दिवाणखाना, त्यात ४-५ आराम खुर्च्या, डाव्या बाजूला तितक्याच आकारच शाय्यागृह आणि मागे प्रसाधनगृहे. घर आवडलं आणि रात्रीच भाडं ठरलं.

सगळ्यांना 'खोतांच' घर आवडलं. खांद्यावरच समान एका कोपर्यात भिरकावलं, आणि आराम खुर्चीत पडलो. संभा, KD ,सेंड्या जेवणाची सोय लावून आले. कपडे बदलले व गावात चक्कर टाकण्यासाठी बाहेर पडलो. मस्त हवा सुटली होती. कोणी सुरुवात केली माहिती नाही पण 'किशोरदांची' गाणी सुरु झाली. एकाने गाणं म्हणायचं, इतरांनी त्या गाण्याचा चित्रपट, नायक, नायिकेच नाव सांगायची. तास-दीड तास हि मैफिल सुरु होती. सगळेच जन आपापल्या आवाजात किशोरच्या गाण्यांची इज्जत काढत होते. जेवणाच्या जागी पोहोचलो. या सगळ्या माकडांनी खेकड्यांचा बेत केला खरा पण मी सोमवारी मांसाहार करीत नसे. आणि खेकडे म्हणजे माझी दुखती रग. इतरांच्या ताटातील खेकडे मला पाहवत नव्हते. मी चुपचाप ताटात पडलेल्या बटाट्याच्या आणि मेथीच्या भाजीकडे केविलवाण्या नजरेने पाहत होतो. अहो! खेकडे आणि बटाटा यात काहीतरी साम्य आहे का...काही तुलना? हे म्हणजे एखाद्याला हात-पाय बांधून त्याच्या समोर रंभा-उर्वशी नाचवण्यापैकी होत. कसबस उरकत घेवून पटकन बाहेर आलो. शेजारून येणाऱ्या खेकड्यांच्या नांग्यांचे आवाज ऐकवत नव्हते. खोलीवर परतताना संभा म्हणाला,"एवढेही खास नव्हते रे खेकडे..." तेवढं ऐकून मला का कोण जाणे उगाचच बर वाटल. 'कोल्ह्याला द्राक्ष आंबटच...'
खोलीवर जायचा विचार टाळून सगळे किनार्यावर आलो. निवांत फिरत होतो. मुरुडचा किनारा बराच माणसाळलेला होता. मी व विर्या दूरवर चालत गेलो. अशा एकांताच्या क्षणी प्रत्येकाला 'आपल्या' माणसाची ओढ असते. विरु च्या बोलण्यातून ते जाणवत होत. तो खूप वेळ बोलत होता. त्यातलं ९९% मी ऐकतच नव्हतो. मी देखील 'माझ्या' माणसाच्या आठवणींत हरवलो होतो. संभाच्या मोठ्या आरोळीने माझी तंद्री भंगली.पोरांनी मस्त पैकी शेकोटी पेटवली होती. आणि किशोरच्या गाण्यांची चिरफाड करत बसले होते. त्यांना जावून मिळालो. १२ वाजेपर्यंत तिथेच किनार्यावर गप्पा, मस्ती, गाणी, 'आतले' विषय इ.इ.इ. सुरु होत. साडेबारा ला घरी येवून पडी मारली.

सकाळी सातला उठलो. घरच मगच दार उघडलं तर माझ्या समोर.. नव्हे मी एका सुपारीच्या बागेसमोर उभा होतो. च्यायला खरच एवढ सुंदर वातावरण मी कधीच पाहिलं नव्हत. बागेतून मस्त एक चक्कर टाकली. सगळ्यांना उठवळ पुन्हा किनार्यावर घेवून गेलो. कडक चहा मारला. आणि थोडा वेळ शेवटच समुद्रात पोहलो आणि लगेच निघालो. घरी येवून पटपट तयार झालो. आता सुरु होणार होता परतीचा प्रवास. खोतांच्या हातावर धन्यवादाचे मानधन ठेवलं. आणि ११ च्या सुमारास निघालो.
संभा म्हणाला असूद ला केशवराज मंदिरात जावूया. गेलो. मंदिर बराचस उंचीवर होत. पण आता पाय थकले होते. दोन-तीन दिवसांच्या प्रवासाचा थकवा जाणवण्यास सुरुवात झाली. सगळ्यांच्याच उत्साहाला आता उतरण लागली होती. देवच दर्शन घ्यायचं म्हणून चालत होतो आणि प्रत्येक पावला सोबत संभ्याला एक शिवी देत होतो. घाभार्यात जावून श्री हरी विष्णूंच दर्शन घेतलं. मंदिराच्या आजूबाजूला फिरणारी 'नयनरम्य प्रेक्षणीय स्थळ' पाहून जरा बर वाटल. इतक्या वर येवून काहीतरी नेत्रसुख मिळाल. दापोलीमध्ये आलो सगळ्यांच्या मोबाईल ला नेटवर्क मिळाल. सगळ्यांनी आपापल्या घरी जिवंत असल्याची खात्री पटवली. निघालो. आता पोटात उंदीर नाचत होते.
खेडमध्ये गाडी थांबवली व एका हॉटेल मध्ये घुसलो. कुणी मटन घेतलं कुणी चिकन आणि कुणी बांगडे. तुटून पडलो. दोन-तीन दिवसांचा कसूर काढला. यथेछ जेवलो. अगदी कंठापर्यंत येईपर्यंत. मला तर वाटल इथेच मुक्काम करावा. इतक हादडल होत. खेड सोडलं. माझी व संभाची अशीच काहीतरी बडबड सुरु होती अचानक समोरून येणाऱ्या एसटी च्या मागून जीपगाडी समोर आली. आमच्या समोर KD होता व आम्ही मागे. त्याने झटकन गाडी रस्त्याखालच्या मुरुमात घातली त्या पाठोपाठ आम्हीपण. आम्हा सगळ्यांच्याच कपाळात गेल्या होत्या. काही इंचाच्या फरकाने सगळेच वाचलो होतो.
पोलादपुरात जरावेळ थांबलो. मी पानवाला पहिला व पान घेतली. १० मिनिटांची विश्रांती आणि तांबुलभक्षण संपवून निघालो. १० च मिनिट झाली असतील बिरवाडी जवळ एक उमद 'पाखरू' चाललं होत. वीर्याच्या मनात काय आल कोण जाणे त्याने पाखराला शिटी मारली. पाखरू थाबकाल आणि वळून पाहायला लागल. वीर्याच्याच काय आमच्या सगळ्यांच्याच शिट्या वाजल्या. पुढे जावून सगळ्यांनी विर्याला शिव्या घातल्या. उगाच धावती गाढव अंगावर...

पुढचा थांबा होता वरंधा घाट. जर चहा पाणी घेतलं. आणि दुखणाऱ्या पार्श्वभागाला थोडा आराम दिला. पण घराची ओढ बसू देत नव्हती. पुन्हा गाड्या निघाल्या भोरमध्ये एक थांबा घेवून थेट कात्रज मध्ये आलो. जिथून प्रवासाला सुरुवात झाली तिथे. आता परत वेगळ व्हायचं होत. सगळ्यांना पुन्हा भेटलो. अगदी कडकडून मिठी मारून. नवीन मित्र मिळाले होते गेले तीन दिवस एका कुटुंबासारखे राहिलो. माझ्या आयुष्यातील पहिली सहल या सगळ्यांमुळे अविस्मरणीय झाली होती. आणि सांगायचं राहील या सहलीत मला व संभाला एक नवीन नाव मिळाल "दो हंसो का जोडा.." असो...
धन्यवाद मित्रांनो...!!!

Friday, 9 December 2011

प्रवासवर्णन : एक अधुरा प्रवास - जंजिरा

 दिनांक : ३० ऑक्टोबर २०११.


          दिवाळीच्या सुट्ट्या सुरु होत्या आणि शेवटचा दिवस बाकी होता. घरी राहून खूप कंटाळलो होतो. गण्याला फोन टाकला आणि जंजिरा फिरून येऊ म्हणालो, त्याला सुट्टी नव्हती पण तो हो म्हणाला व जाण्याच नक्की झाल. लांबचा पल्ला आणि जाणारे दोघेच म्हणून सोबतीला आणखी दोघांना घेण्याचा निर्णय केला आणि गण्याने दोन मित्रांना तयार केल. आता माझ्यापुढे यक्षप्रश्न होता आमच्या वडिलांकडून परवानगी घेण्याचा. कारण आमचे पिताश्री म्हणजे शिस्तप्रिय आणि हिटलरवादी. अगदी नाक रगडून आणि गयावया करून "फिरायला" जाण्याची परवानगी घेतली. आमचा आमच्या वडलांचा आमच्यावर खूप जीव कारण शेंडेफळ ना घरातल! त्यांना सांगितलं मावळात चाललोय, आणि जवळच आहे म्हणून परवानगी मिळाली. जाण्याची तयारी झाली, तयारी म्हणजे काय? पाठीवर दप्तर, पूर्ण चार्ज केलेले मोबाईल आणि एक ३/४ विजार. इंटरनेट वरून अंतर काढाल, "पुणे-अलिबाग" १೪೦ किमी फक्त!! त्याहीशोबाने गणित केल आणि विचार केला आगदी आरामात गेलो तरी तीन-साडेतीन तासात जाऊ. या आधी खूप किल्ले फिरलो होतो पण जा जरा जास्तीचा पल्ला होता व नेहमी प्रमाणे नियोजन पार पडत होत.
          ३० ऑक्टोबर ला पाहते ५.३० ला भोसारीतून निघालो मी-गणेश आणि रोहित-सचिन असे चौघे निघालो. उत्साहाला तर नुसत भरत आल होत कारण मी पहिल्य्पासून शिवभक्त आणि गेले दीड-दोन वर्षपासून शिवचरित्रे, इतिहास,कादंबर्या, ग्रंथ इत्यादी वाचण्याच वेड जडल होत आणि जंजिर्याचा इतिहास तर पाठ झाला होता "अभेद्य जंजिरा" पाहण्याची उत्सुकता तर खूप होती. निघालो, राष्ट्रीय महामार्ग ४ ने सुसाट. पहाटेची वेळ, हवेत गारवा भरला होता. लवकर अंतर कपात आम्ही निघालो.
          खोपोलीत आली आणि पोटात भर टाकावी म्हणून थांबलो, सकाळी निघायच्या कैफात मी तर पाणी देखील घेतलं नव्हत. एक उपहारगृहात मिसळीवर ताव मारला आणि चैतन्यकांडी घेतली व बाहेर पडलो. निघणार इतक्यात घात झाला, दुचाकीच लॉक खराब झाल, आता काय? कारण इतक्या सकाळी कोणी दुरुस्तीवाला मिळण म्हणजे वाळवंटात पाणी मिळण्यासारखाच होत. पाऊन तास स्वत: खटाटोप केली पण व्यर्थ! शेवटी एक रिक्षावाल्या काकांना विनंती केली त्यांनी काय केल ठाऊक नाही पण गाडी सुरु झाली. प्रवास सुरु झाला. पूर्ण रस्ता ठाऊक नसल्याने विचारत विचारात पुढे सरकत होतो. माझ्या डोक्याला जास्त ताण याचा होता कि ठरलेल्या वेळेपेक्षा पाऊन तास उशीर होणार होता. पुढे जाताना गण्याच्या डोक्यात विचार आला पालीला जाऊन गणरायाच दर्शन घेऊन पुढे जाऊयात. पण आमच्या सर्वांच्या मतदानानुसार त्याच पाली विधेयक नामंजूर झाल व सर्वांनी अलिबाग कडे गाड्या सुसाट सोडल्या. महामार्ग संपला दुसरा घात झाला. रस्ता!! रस्ते इतके खराब होते कि वाटल इथल्या राजकारण्यांनी पिंपरी-चिंचवड ला रस्ते पाहून याव. जेथे आमच्या दुचाकी ६०-७० प्रतिताशी च्या हिशोबी धावणार होत्या त्यांचा वेग आता ३०-४० प्रतितास इतका झाला. यासर्व गोष्टींची मला व गण्याला बर्यापैकी सवय होती पण रोहित आणि सच्या जाम वैतागले होते. समुद्रातठ दिसला अन जीवात जीव आला पण अजून किती अंतर कापायचं याचा कुणालाच अंदाज येत नव्हता. कारण सरकारी फलक जे अंतर दाखवत होते त्यापेक्षा हे अंतर हनुमंताच्या शेपटी प्रमाणे वाढतच होते. रडत-खडत १५० किमी चा रस्ता पार पडून अलिबाग ला पोहोचलो. सचिन आणि रोहित ने सुचवलं समुद्रात जाऊन येउयात. पण आमच लक्ष ठरलेल होत जंजिराच!!!
          अलिबाग ला पोहचलो तेव्हा १०.१५ झाले होते ठरलेल्या वेळेच्या सव्वातास उशीर. मनात आल इथून जंजिरा ८-१० किमी असेल आपण लगेच पोहचू. रोहित ने विचारल कि "अजून किती जायचं?" आणि त्याचा वैतागलेला चेहरा पाहून मी मस्करी च्या हेतूने बोललो "अजून ५०-५५ किमी जायचं." मुरुड च्या दिशेन निघालो आणि रस्त्यात एक धूसर, अस्पष्ट पाटी वाचली 'मुरुड-जंजिरा : ५२ किमी' आता मला कळेना हसव कि रडावं. मघाशी केलेली थट्टाखरच निघाली आणि पुन्हा एकदा नवीन संकट उभं राहील. आणि त्यात कहर म्हणजे खराब रस्ता. राहित्या तर अगदी रडकुंडीला आला होता. आम्ही बोलून-चालून पुणेकर, आणि पुण्यातल वातावरन मानवलेली मानस. आणि इथे वरून सूर्यदेव आपला प्रकोप दाखवत होते, दमट वातावरण, न संपणारा रस्ता आणि आम्हा दोघांचा जंजिर्याचा हट्ट. मुरुड चा रस्ता विचारत विचारत पुढे सरकत होतो. एका ठिकाणी वाचाल 'मुरुड २१ किमी' जरा हायसं वाटल. पुढे गेलो पुन्हा तेच 'मुरुड २० किमी'. साला! अस वाटल कि झक  मारली आणि इथे आलो. शेवटी ११.३० ला मुरुड ला आलो आणि जंजिर्याच प्रथम दर्शन झाल. अजून आमच्याकडे साडेतीन तास होते. कारज जाण्याच्या आधी निघण्याची वेळ ठरवली होती, काहीही झाल तरी दुपारी ३ वाजता परत निघायचं. गाडीतळावर गाडी लावली आणि गण्याने अजाणतेपणी गाडी लॉक केली, आणि संपल! मी बोट च्या तिकिटासाठी सांगेत उभा होतो . तिकीट घेतली होती आणि बोटीकडे जाण्याच्या रांगेत होतो. मनात विचार होते इथपर्यंत कसेतरी पोहचलो आता आणखी विघ्न नकोत. आणि इतक्यात गणा आलाच आणि सांगितलं गाडी पुन्हा लॉक झालीये. रांग सोडली आणि गाडीसाठी पुन्हा प्रयत्न सुरु झाले. दुसर्या गाडीने मुरुड गावात गेलो. कोणीही मेकॅनिक भेटेना, एक चावी बनवणारा भेटला पण तो म्हणाला, " मियां, हम तो शादी में जा रहे है, खाना खा कर हि आएंगे." आणि त्या सर्व भागात मुसलमान वस्ती, दुपारचे १ वाजलेले सगळ्याची नमाज ची वेळ असल्यामुळे दुकाने बंद. अर्धा तास उन्हात थांबलो पण कोणीही भेटलं नाही. गण्या चा फोन आला 'गाडी सुरु झाली माघारी या.' जाऊन पाहतोय तर पुन्हा लॉक झाली. इतका मनस्ताप झाला कि बस. आधीच समुद्राकाठची दमट हवा व वातावरण, अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा, घोट-घोट पाण्यासाठी मोजावी लागणारी किंमत, मुसलमान व्यापार्यांनी चालवलेली लुट, फसलेल सगळ नियोजन आणि समोर होती लॉक झालेली गाडी. आम्ही चौघेही अगदी मेटाकुटीला आलो होतो. या दरम्यान किती तरी "हिंदू" लोकांनी मदत केली, पण व्यर्थ. शेवटी गणा ने थोड धाडस केल तोंडात पेट्रोल घेतलं आणि लॉक मध्ये सोडलं व थोड खोबरेल तेल सोडलं. लॉक निघाल आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. ६-७ किमी मुरुडला समुद्रकिनार्यावर आलो. दीड-दोन तास घामाने निथळलो  होतो. फक्त खिशातल्या चीजवस्तू काढून तसाच पाण्यात झोपलो. पहाटे पासूनचा ६ तासांचा प्रवास, अगणित विघ्न, व झालेला शीण जरा धुऊन काढला. पुन्हा चैतन्यकांडी घेतली, जरा बर वाटल. आता मेकॅनिक शोधन मोठ काम होत. मुरुड गावात एक चक्कर मारली, एक स्पेअर पार्टस च दुकान दिसलं पण बंद, नाव होत "राज ऑटोमोबाएल्स" एक हिंदू नाव वाचल   आणि मदतीची अशा लागली. बोर्डवरून नंबर लावला, आणि त्याला घरून बोलावलं. त्याने गाडी कामचलाऊ करून दिली. त्याचे मानधनासह शतश: आभार मानले. घड्याळात पाहिलं तर वाजले होते ३ !!
          निघालो, सकाळपासूनचा प्रवास, समोर असून जंजीर्याने दिलेली हुलकावणी. या सर्वांची हुरहूर मनात होती. खूप नाराजीने परतीचा प्रवास सुरु झाला. माझ्या मनावर एक मोठ दडपण होत वडिलांना दिलेली वेळ पाळण. आलिबाग कडे आलो. एका पोलीस काकांना विचारल पुण्याला जायला जवळचा रस्ता विचारला व त्या नवीन रस्त्याने निघालो. गाडीवरच गण्याने सांगितलं कि आता "ताम्हिणी घाटातून" जायचं आहे काहीतरी गिळून घ्या. नजर आजूबाजूला फिरली तर साला काहीच नव्हत. एका वडापाव च्या गाडीजवळ थांबलो दोन-चार वडापाव चेपले, चैतन्यकांडी घेऊन निघालो. रस्ता नक्की ठाऊक नव्हता, कारण कुणाच्या तरी सांगण्यावरून इतक्या दुराचा पल्ला करावा कि नाही यावरून गणा आणि रोहित मध्ये मतभेद होते तर मी आणि सच्या तटस्थ होतो.
          आता कोलाड गावात पोहोचायचं होत, तिथून घाटात जाण्यासाठी रस्ता होता. रस्त्यातच ४-५ दुचाकी दिसल्या आणि नंबर पहिले तर "MH - १२", जरा हायस वाटल कारण त्या घाटाच्या बर्याच गोष्टी एकूण होतो त्याही वाईट कारणासाठीच. म्हणून सोबती भेटल्याचा आनंद होता पण ते साले जास्तच हळू चालवत होते आणि आम्हाला वेळेच बंधन होत. मग सुसाट निघालो, घाटाच्या रस्त्याला लागलो किती अंतर हे माहिती नव्हत पण गाडीत पेट्रोल भरपूर होत, विचार केला जे होईल ते होईल रस्ता संपेपर्यंत चालतच राहायचं. रोहीत्या जरा जास्तच वाईट चालक होता, मागे बसणाऱ्याचा विचार करताच नव्हता. गाडीचा वेग ६०-७० ने होता आणि अचानक समोर "नागराज" अवतरले. जर ब्रेक लावावा तर आम्ही जाणार आणि नाहीतर नागराज. रोहीत्याने गाडी तशीच त्याच्यावरून घातली. त्याला या प्रसंगच काहीच वाटल नाही पण माझ्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली कारण माझा जन्म शेषकुळातला आणि आमच्यात नाग-सर्प मरण निषिद्ध, देवाला कुठे मारतात का?
          अंधार पडत होता, वेळ जात होती, रस्तापाहून तर आधी कॉंग्रेस सरकारला आणि नंतर गण्याला शिव्या देत होतो. अंधार पडला आणि सगळ्याचीच फाटली. समोरच काहीच दिसत नव्हत. गण्याच्या गाडीची हेडलाईट काम करत नव्हती, सकाळपासूनच्या अविश्रांत परिश्रमान आमच्या गाडीच कंबरड मोडल होत. तितक्यात एक चारचाकी वाला थांबला, विना हेडलाईटचा सगळ्या कुटुंबासोबत हा दिड्शाहाना ताम्हिणी घाटातून चालला होता. त्याने विनंती केली तुमच्या गाडीच्या प्रकाशात आम्हाला येऊ दयात. आता खरी कसरत सुरु झाली, गण्या पुढे माघे आम्ही व आमच्या मागे तो चारचाकी घेऊन एका गाडीच्या प्रकाशात चालल्या होत्या. व मस्त सर्कस सुरु होती. हवेत गर्व भरला होता अंगावरचे कपडे अजूनही ओलेच होते. थंडीने सगळेच कुडकुडत होते पण शब्द कुणाच्याही तोंडातून फुटत नव्हते. जसा अंधार पडला तसा माझा तोंडून अजाणते पाणी हनुमान चालीसा सुरु झाली. दिवसभर गझल म्हणत होतो आणि चालीसा ऐकल्यावर रोहीत्याने हटकलं आणि मी मोबाईल वरच मोठ्या आवाजात सुरु केली. त्या ७०-८० किमी च्या प्रवासात मी कितीवेळा चालीसा म्हणालो ते साक्षात हनुमंतालाही मोजता येणार नाही. रस्ता काही संपत नव्हता सगळेच अगदी रडकुंडीला आल्यासारखे दिसत होते. रोहित असा प्रवास या आधी कधीच केला नव्हता. शेवटी तो भयानक रस्ता संपला, जवळ-जवळ ८० किमी एका गाडीच्या प्रकाशात प्रवास केला. त्या निर्लज्ज चारचाकी वाल्याने आणखी १०-१२ किमी चालण्याची विनंती केली आणि कोरडे धन्यवाद हि नाही दिले. जरा थांबलो. माझ्या घरून फोन आला वडिलांनी भरपूर संचार घेतला. रोहित ला पण फोन आला त्याच्यावरही घरून चांगलीच सरबत्ती झाली. १०-१५ मिनिटे थांबलो आणि पुन्हा निघालो. शहरातले रस्त्यावरचे दिवे पहिले आणि मघाचे दोन-अडीच तास आठवले.
          मी,गणा,सचिन आधीच हाडाचे आजारी म्हणजे तिघानाही कसला ना कसला त्रास होता. माझ्या उजव्या पायाला मी ३ वर्षांपूर्वी अपघातात मोडून घेतला होता. गण्या तर ७-८ महिन्यापूर्वीच मरता-मरता वाचला होता, ७ सळया होत्या उजव्या हातात, ६ काढल्या होत्या आणि अजून एक हातातच होती. आणि सचिनला तर अनुवांशिक माकडहाडाच दुखन होत. परतताना थंडीने आणि अविश्रांत प्रवासाने आम्हा तिघांच्या अवयवांनी साथ सोडली होती. त्याचं नाही ठाऊक पण माझ्या गुढग्यात प्रचंड कला येत होत्या, अगदी दिल्यात पाणी उभ राहील होत. फक्त वाट पाहत होतो शेवटच्या काही मिनिटांच्या प्रवासाची. तेही क्षण सरले, भोसरीत पोहोचलो. सगळ्यांची गळाभेट घेतली सचिन - रोहित आपापल्या घरी परतले. गण्याने घरी सोडलं आणि तोही परतला. प्रवास संपला. संपूर्ण अंग ठणकत होत डोल्यंतून अखंड पाणी वाहत होत आणि लाल होऊन सुजलेही होते बिचारे. खूप सार्या कडू आणि थोड्याश्या धाडसी आठवणी घेऊन परतलो होतो पण दुचाकीवर फिरण्याचा माज मात्र पुरता मोडला होता आणि आमचा एका दिवसात एकूण प्रवास झाला ४२५ किमी फक्त!!!
           हे प्रवासवर्णन लिहिताना एक गोष्ट मनात आली कि इतिहासात छत्रपती शिवरायांना याच किल्ल्याने सतत २०-२२ वर्षे आठ चढायात हुलकावणी दिली. छत्रपती शंभूराजांनी सुद्धा एकदा चढाई केली पण तेव्हाही जन्जीर्याने महाराजांना हुलकावणी दिली. जिथे या दोन युगपुरुषांना किल्ल्याने फसवल तिथे आम्ही कीस पेड कि पत्ती, असा विचार आला. पण हे जन्जिर्याचाच दुर्दैव आपल्या महाराजांचे आणि युवराजांचे चरणस्पर्श झाले नाहीत...